By  
on  

झुमका आणि निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये  ‘वाजले की बारा’ फेम अभिनेत्रीने पोस्ट केले हे सुंदर फोटो

‘वाजले की बारा’ या गाण्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरचं कला विश्वातील करियरमध्ये वेगळाच बदल आला. विविध मराठी सिनेमे करत असतानाच अमृता हिंदी सिनेमांमध्येही झळकू लागली. तिच्या चाहत्यावर्गात दिवसा गणीक वाढ होताना दिसतेय. विशेष करून सोशल मिडीयावर अमृतासाठीचं चाहत्यांचं प्रेम हे सतत पाहायला मिळतं. लॉकडाउनच्या काळात अमृता तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर विविध फोटो पोस्ट करत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#mondayblues #akchikankari #jhumkaas

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

नुकतेच अमृताने तिच्या सिंपल आणि सुंदर लुकमधील काही पोटो पोस्ट केले. हे फोटो चाहत्यांना इतके आवडले की त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव या फोटोंवर केला. 
या फोटोंमध्ये अमृताचा झुमके आणि निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला लुक आहे. 
अमृताही वेस्टर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही लुकमध्ये सुंदर दिसते. आणि तिच्या दोन्ही लुकमधील फोटोंना चाहत्यांची नेहमीच पसंती असते. मात्र या सिंपल लुकला चाहत्यांच मिळालेलं प्रेमही तिच्यासाठी खास असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive