By  
on  

चित्रीकरण सुरु होण्याच्या बातमीने सुखावली ही अभिनेत्री, शेयर केली ही ऑफस्क्रिन आठवण

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम थांबलं होतं. त्यामुळे कलाकार घरातच बसून चित्रीकरण कधी सुरु होणार याची वाट पाहत होते. आणि नुकतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नियम आणि अटीसंह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. तेव्हा या नियमांचं पालन करून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहेत.

इतर कलाकारांसह अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील या बातमीने सुखावली आहे. आणि म्हणूनच तिने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिच्या चित्रीकरण दरम्यानच्या काही खास आठवणी शेयर केल्या आहेत. चित्रीकरण करतानाच्या बिहाईंड द सीन्स म्हणजेच कॅमेऱ्यामागचे काही क्षण शेयर केले आहेत.
या पोस्टमध्ये प्राजक्ता लिहीते की, ““सूना है.. अच्छे दिन आयेंगे”
तेव्हा प्राजक्ता तिच्या चित्रीकरणाचे हे दिवस पुन्हा जगण्यासाठी उत्सुक असल्याचं या पोस्टमधून पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive