By  
on  

पाहा Video : अभिनेत्री अमृताने आईच्या वाढदिवसाला दिलं हे हटके सरप्राईज

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आयुष्यात सगळ्यात जवळ असलेली व्यक्ती म्हणजे तिची आई. अभिनेत्री म्हणून करियर सुरु असतानाही तिची आई कायम तिच्या सोबत असते. अमृता तिच्या यशाचं श्रेय हे नेहमी तिच्या आईला देत असल्याचं बहुता म्हटली आहे. नुकतच आईच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मिडीयावर आईसाठी खास पोस्टही लिहीली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mom hates bday cakes. The only thing she loves is desserts with ice cream and mangoes Since it was her 60 th bday I had to make her something special So decided to make an #oreocake Ingredients - Oreo biscuits - milk - Nutella or dairy milk 1) grind the biscuits in a mixer 2) add milk to make a nice thick paste 3) pour it in a bowl which can fit into a cooker 4) fill the cooker with a little bit of water, put the lid on but take out the “sitti” 5) keep checking the cake after 15 mins as it should look like a cake 6 ) garnish it with Cadbury and icecream with chocolate sauce Ps- you can have one layer of Oreo chocolate then add Nutella or melted Cadbury , then again add the Oreo chocolate layer .... it will taste like a choco lava cake

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

मात्र आईच्या वाढदिवसाला खास सरप्राईज देण्याचं अमृताने ठरवलं. लॉकडाउनच्या काळात अमृताची आई तिचे सगळे खाण्याचे लाड पुरवते. मात्र यावेळी आईसाठीच काहीतरी पदार्थ बनवण्याचं अमृताने ठरवलं. मग अमृताने थेट स्वयंपाकघर गाठलं आणि बनवला ओरियो केक. ओरियो केक विथ आईस्क्रिम हे अमृताच्या आईला आवडतं म्हणूनच अमृताने आईसाठी हे सरप्राईज तयार केलं. वाढदिवसाला हाच केक वर्थडे केक म्हणून कापण्यात आला. याचा व्हिडीओही अमृताने पोस्ट केला आहे.

 

सोशल मिडीयावर अमृताचे जास्तीत जास्त व्हिडीओ आणि फोटो हे तिच्या आईसोबतचे असतात.  अमृता कुठेही चित्रीकरणासाठी जाते तेव्हाही तिची आई तिची काळजी घेण्यासाठी कायम सोबत असते. लॉकडाउनमध्ये साजरा केलेला हा वाढदिवस अमृता आणि तिच्या आईसाठी कायम स्पेशल असेल  एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive