टिक टॉक या ऐप्लिकेशनने तरुणाईसह कलाकारांनाही वेड लावलं आहे. बहुतांश कलाकारांचे एन्टरटेनिंग व्हिडीओ या ऐपवर पाहायला मिळतात. मात्र सध्याच परिस्थिती आणि चीन-भारत संबंध पाहता चायनीज एप्लिकेशन्स न वापरण्याचं आवाहन विविध सोशल मिडीया माध्यमातून केलं जात आहे.
अभिनेत्री अमृता देशमुखनेही असच ठरवलं आहे. टिक टॉकवर अमृताचे असंख्य चाहते आहेत. तिचे विविध व्हिडीओ हे टिक टॉकवर व्हायरल होत असतात. मात्र आता टिक टॉक न वापरता हे ऐप्लिकेशन अन इन्स्टॉल म्हणजेच फोनमधून काढून टाकण्याचा निर्णय अमृताने घेतला आहे.
चायनीज ऐप्सला पर्याय म्हणून विविध भारतीय ऐप्स उपलब्ध असल्याचही ती तिच्या सोशल मिडीया पोस्टवर म्हणतेय. तेव्हा आता अमृताचे विविध हटके टिक टॉक व्हिडीओ आता ती वापरत असलेल्या भारतीय ऐप्लिकेशन्सच्या तिच्या अकाउंटवर पाहायला मिळतील.