By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीवर या शॉर्ट फिल्ममध्ये भाष्य, या लघुपटात आहे अभिनेत्री नम्रता गायकवाड

सध्या कोरोना व्हायरसचा सुळसुळाट आणि लॉकडाउन या परिस्थितीवर घरातच बसून विविध व्हिडीओ तयार केले जात आहेत. अशीच एक शॉर्ट फिल्म काही कलाकारांनी मिळून तयार केली आहे. अभिनेत्री नम्रता गायकवाड, कांचन पगारे, अमेय हुनसवडकर, अमोल जाधव हे कलाकार या लघुपटात आहेत. नऊ मिनीटांच्या या लघुपटात सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. 'रेड झोन' असं या लघुपटाचं नाव असून यातला थरार महत्त्वाचा संदेशही देऊन जातो..

 

लॉकडाउन असतानाही काही तरूण घराबाहेर पडून स्मोकिंग करण्यासाठी जात असतात. त्यांच्या या कृतीवर हा लघुपट चपराक ठरतोय. या सर्व कलाकारांनी या लघुपटासाठी  आपआपल्या घरातूनच चित्रीकरण केलं आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री नम्रता गायकवाडची वेगळी भूमिका या लघुपटात पाहायला मिळतेय. काही मिनीटांच्या परफॉर्मन्सने नम्रताने चाहत्यांना सरप्राईज केलं आहे. 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive