By  
on  

संदिप कुलकर्णी साकारत आहेत ‘कृतांत’मध्ये हटके भूमिका, ट्रेलर अवश्य पाहा

कलाकाराच्या आयुष्यात एखादा तरी अशी व्यक्तिरेखा येतेच त्यात अगदी जीव ओतावा लागतो, मग ती व्यक्तिरेखा कौतुकाची धनी ठरते. असंच काहीसं झालंय संदिप कुलकर्णी यांच्याबाबत.
‘कृतांत’ सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दत्ता भंडारे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विजया मिश्रा हे या सिनेमाचे निर्माते आहेत. या टेलरमध्ये कथेचा सशक्तपणा तर जाणवतोच, त्या जोडीला जाणवतं ते लोकेशन्सचं सौंदर्य. या सिनेमाचा बहुतांश भाग ग्रामीण पार्श्वभूमीवर असल्याने उत्तम निसर्गसौंदर्याचं दर्शन प्रेक्षकांना घडेल.


या सिनेमात कथा, पटकथा आणि संवादलेखनही दत्ता भंडारे यांनीच केलं आहे. या कथेतून प्रत्येकाला स्वत:चं असं काहीतरी गवसेल हा विश्वासही दत्ता भंडारे यांनी व्यक्त केला आहे. संदिप कुलकर्णी यांच्या जोडीला सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. दत्ताराम लोंढे यांनी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्माता आहेत. हा सिनेमा येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=7&v=7btckDefN6A

Recommended

PeepingMoon Exclusive