केरळमध्ये खाण्याच्या शोधात आलेल्या एका गर्भवती हत्तीणीला अननसातून फटाके खाऊ घालणाऱ्या निष्ठूरांना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. या समाजकंटकांप्रतीचा राग सोशल मिडीयावरही व्यक्त होत आहे.
गायक रोहित राऊतही या बातमीने प्रचंड हळहळला आहे. त्याने त्याची भावना एका कवितेतून व्यक्त केली आहे. त्याने सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. गजमाता आम्हाला माफ कर आम्ही तुला गमावलं म्हणत त्याने ही कविता म्हटली आहे. रोहित राऊत लिहीतो की, “जान थी वह इक जान के अंदर, भगवान थी वो भगवान के अंदर, ग्यारह दिन बस मानते तुझको, बाकी दिन हैवान है अंदर, गलती की के रखा भरोसा, मां थी ना बस होगया धोखा.”
विरोधात चीड आणि त्या गजमातेच्या अशा अवस्थेत झालेल्या निधनाचं दु:ख सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केलं जात आहे.