पाहा Video : सुबोध भावेच्या घरी रंगलाय हापूस बास्केटबॉलचा खेळ

By  
on  

लॉकडाउनच्या काळात घरात वेळ घालवण्याचे विविध पर्यात उपलब्ध आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही विविध गोष्टी या दरम्यान करत आहेत.
अभिनेता सुबोध भावे या निमित्ताने त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवतोय. या दरम्यान तो पत्नि आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ देत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हापूस बास्केटबॉल नवा खेळ #filmybhaves

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

नुकताच सुबोध भावेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सुबोधचा लहान मुलगा मल्हार बास्केटबॉल खेळताना दिसतोय. मात्र या बास्केटबॉलचा बास्केट मात्र बनवलाय आंब्याच्या बॉक्सपासून. ही टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पना या भावे कुटुंबाला सुचली. सध्या आंब्याचा सिझन सुरु असल्याने भावे कुटुंबाने फस्त केलेल्या हापूस आंब्याच्या बॉक्सचा असा वापर केला आहे.  आणि मग काय सुबोधचा मुलगा  याच हापूस बास्केटबॉलचा खेळ खेळू लागला. सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना हा मजेशीर व्हिडीओ आवडतोय.

Recommended

Loading...
Share