By  
on  

आणि किशोरी शहाणे-वीज यांनी अनुभवला चक्रीवादळाचा तडाखा

करोना संकटामुळे अनेकजण हे लॉकडाऊन काळात ज्यांना शक्य झालं आहे ते आपल्या गावी किंवा फार्म हाऊसवर घालवत आहेत. निसर्ग सानिध्यात ते हा लॉकडाऊन कुटुंबियांसोबत मजेत घालवत आहेत. यांपैकीच प्रसिध्द अभिनेत्री किशोरी शहाणेसुध्दा आहेत. पती दिपक वीज व मुलगा बॉबी वीज यांच्यासोबत त्या आपल्य फार्म हाऊसवर संपूर्ण लॉकडाऊनचा काळ घालवत आहेत. तिथल्या गमती-जमती, फोटो -व्हिडीओ यामधून त्या नेहमीच चाहत्यांच्या  संपर्कात राहतात.  पण ३ जून रोजी त्यांच्या फार्म हाऊसच्या गिरीवन हिल्स या भागाततसुध्दा निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. 

ह्या निसर्ग चक्रीवादळाच तडाखा किशोरीताईंनी खुद्द आपल्या कॅमे-यात जमेल तितका टिपला आणि चाहत्यांपर्यंत पोहचवला. तसंच आता इथे वीज, इंटरनेट काहीही उपलब्ध नसून पुढील काही दिवस माझा तुमच्याशी संपर्क थोडा मुश्कीलच असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्या सुखरुप असल्या तरी त्यांच्या आजूबाजूचा परिसराला, झाडांना वादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. 

 

निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकले होते. याचा तडाखा जिल्ह्यातील १२ तालुक्यांना बसला. अधिकक्षेत्रावरील फळबागा उध्वस्त झाल्या, तर ५ लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले. अनेक जणांचे संसार उघड्यावर आले. वीजपुरवठा खंडीत झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भाग अंधारात आहे. तर दूरसंचार यंत्रणा कोलमडल्या आहेत. लाखो झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive