पाहा Video : ही अभिनेत्री म्हणते "आवडलं नाही तर तमाशा करू नका"

By  
on  

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. बहुतांश लोक काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच काहींंनी आवडती वाद्य शिकण्यासही सुरुवात केली आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही समावेश आहे.

अभिनेत्री अमृता देशमुखने काही दिवस सोशल मिडीयापासून ब्रेक घेतला होता. खासकरून इन्स्टाग्रामपासून दूर गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. सध्या अमृता किबोर्ड हे वाद्य शिकतेय. आणि नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक हिंदी गाण्याची धून वाजवताना दिसतेय. याआधीही तिने एकदा असाच व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यावर अभिनेता आयुष्मान खुरानाने कमेंट केली होती. मात्र या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अमृता लिहीते की, "पसंद ना आए तो तमाशा मत करना, अगर तुम साथ दोगे तो अच्छा लगेगा , तुम्ही हे गाणं ओळकू शकता ?"

 

अमृताने 'अगर तुम साथ हो' हे गाणं किबोर्डवर अतिशय सुंदर वाजवलय. लवकरच अधीक सराव करून अमृता विविध गाणी वाजवताना दिसेल एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share