लॉकडाउनमध्ये या अभिनेत्रीला येत आहे या गोष्टीची आठवण

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात विविध क्षेत्राला मोठ्या अडचणींना सामोर जावं लागत आहे. लॉकडाउनचा फटका मनोरंजन विश्वालाही बसला आहे. या काळात चित्रीकरण बंद झाल्यामुळें मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र इतके दिवस घरात बसलेले कलाकारांना चित्रीकरणाची, सेट्सची आठवण येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I Miss Being There

A post shared by Hruta (@hruta12) on

फुलपाखरू या मालिकेतून प्रसिध्द झालेली अभिनेत्री ऋता दुरगुळे देखील सध्या लॉकडाउनमुळे घरातच आहे. बहुदा चित्रीकरणात व्यस्त असलेली ही कलाकार शुटिंग आणि सेट्स मिस करतेय. नुकत्याच केलेल्या सोशल मिडीया पोस्टवर तिने हे पोस्ट केलं आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, “मी तिथे असणं मिस करतेय.” 
यासोबत तिने तिच्या चित्रीकरणा दरम्यानचा सेटवर असलेल्या म़ॉनिटरचा फोटो पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hope @jinni_03

A post shared by Hruta (@hruta12) on

लवकरच चित्रीकरण सुरु होत असल्याने कलाकारांना मात्र दिलासा मिळाला आहे. काम करण्यासाठी आसुसलेले हे कलाकार लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता सज्ज होत आहेत.
 

Recommended

Loading...
Share