By  
on  

सुबोध भावे म्हणतोय, ‘कोरोना मुळे चेहऱ्यावरचा निसर्ग वाढलाय’

अभिनेता सुबोध भावे या लॉकडाऊनमध्ये अनेक भन्नाट पोस्टमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनमध्ये सुबोधकडे बराच वेळ शिल्लक आहे. हा वेळ तो मुलं कान्हा आणि मल्हार यांच्यासोबत घालवताना दिसत आहे.आताही सुबोधने एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. आज पर्यावरण दिवस याचं औचित्य साधून शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘पावसामुळे बाहेरचा,आणि कोरोना मुळे चेहऱ्यावरचा निसर्ग वाढलाय’.

 

 

यासोबतच त्याने पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. अर्थात सुबोधच्या या पोस्टवर नेटिझन्सनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. आता सुबोध एका ग्लोबल ऑनलाईन शोमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यावेळी त्याच्यासोबत स्पृहा जोशीही आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive