मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा डॅडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण गवळींचा जावई होणार या बातमीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अरुण गवळींची लेक योगितासोबत अक्षयचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता.
कोरोनाग्रस्त परिस्थीतीत लॉकडाउनच्या काळात अक्षय आणि योगिताचा विवाह सोहळा पार पडला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह दगडी चाळीत संपन्न झाला. आणि या लग्नसोहळ्याला एक महिना पूर्ण झाला आहे. या निमित्ताने अक्षयने योगितासाठी एक खास सोशल मिडिया पोस्ट केली आहे. अक्षयने योगितासोबतचे साखरपुड्याच, लग्नाचे आणि इतर फोटो पोस्ट करत लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तो लिहीतो की, “तू सोबत असताना, आयुष्य किती सुंदर वाटतं..उनाड मोकळं, एक रान वाटतं..सदैव मनात जपलेलं, एक पिंपळ पान वाटतं..कधी बेधुंद, कधी बेभान वाटतं..खरंच, तू सोबत असताना आयुष्य किती सुंदर वाटतं. खूप प्रेम बाबो.”
अक्षय आणि योगिता हे मागील काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. योगिता ही अरुण गवळी यांची कन्या असल्याने या लग्नाची प्रचंड चर्चा झाली.