कोरोनाग्रस्त परिस्तितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं होतं. विविधं प्रकारचे चित्रीकरणही बंद होते. मात्र चित्रीकरणाला राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर हळूहळू परिस्थिती पुर्ववत होताना दिसत आहे. काही ठिकाणी चित्रीकरणाला सुरुवातही झाली आहे तर काही लवकरच चित्रीकरणासाठी सज्ज होत आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीही कामाला सुरुवात केली आहे. रवी जाधव हे तब्बल 90 दिवसांनी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एवढच नाही तर त्यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टलाही सुरुवात केली आहे. विविध उत्तम सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे रवी जाधव प्रेक्षकांसाठी काय नवं घेऊन येत आहेत याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
याविषयी पोस्ट करताना रवी जाधव लिहीतात की, "मी 90 दिवसांनी माझ्या कार्यालयात दाखल झालोय. मला ही जागा आणि इथले वाईब्ज आवडतात. आजपासून नव्या प्रोजेक्टलाही सुरुवात करत आहे. मोरया"
शिवाय रवी जाधव प्रेझेंट करत असलेला अनन्या सिनेमाचं काय भवितव्य असेल हे देखील लवकरच समोर येईल.