'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा ची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी खऱ्या आयुष्यातही दानशूर आणि संवेदनशील असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मालिकेतील राणादा जसा सगळ्यांच्या मदतीला धावून येतो तसाच हार्दिकही खऱ्या आयुष्यात तसा आहे.
लॉकडाउनच्या काळात हार्दिक सध्या त्याच्या गावी आहे. आणि तिथे असलेल्या निर्सगरम्य वातावरणात वेळ घालवत तेथील प्राण्यांसोबतही वेळ घालवतोय. तिथे असलेल्या गुरांना जेवण खायला देतोय. नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबत त्याने एक महत्त्वाचा मेसेजही जोडलाय. तो या व्हिडीओत म्हणतोय की, “प्राणी हे देवाकडून आपल्याला मिळालेली भेटवस्तू आहे. ते आपल्याला बिनशर्त प्रेम करण्याचा खरा अर्थ शिकवतात.”
असं म्हणत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हार्दिक गुरांना अन्न खायला देत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. एकीकडे केरळमध्ये हत्तीणीसोबत घडलेला क्रुर प्रकार पाहता, त्या प्रकाराचा निषेध होत असताना या व्हिडीओच्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न हार्दिकने केला आहे.