जोडीदांरासोबत मैत्रीचं नातं असेल तर ते नातं आणखी खुलत जातं. असचं खास मैत्रीचं नातं आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि त्यांचे पति रुचिर कुलकर्णी यांंचं. रुचिर हे मृणाल कुलकर्णी यांचे बालमित्र असल्याचं बोललं जातं. 1990 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती.
नुकताच दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी काही खास फोटो शेयर केले आहेत.
या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नापासून ते आत्तापर्यंतचे फोटो पाहायला मिळत आहेत.
या पोस्टमध्ये मृणाल कुलकर्णी लिहीतात की, "नात्यातलं मैत्र टिकवणं जमलंय याचा आनंद सगळ्यात माेठा"
हे फोटो पोस्ट केल्यानंतर मृणाल कुलकर्णी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.