लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं काम बंद झालं असलं तरी हळूहळू मनोरंजनसृष्टीही पूर्ववत होत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. आणि यासाठीच झी युवा वाहिनीने नव्या शो घेऊन येण्याची तयारी दाखवली आहे.
या वाहिनीने नव्या आगळ्या वेगळ्या टॅलेंटला समोर आणण्याची संधी दिली आहे. 'लाव रे तो व्हिडिओ' असं या नव्या शोचं नाव आहे. या शोच्या माध्यमातून हटके टॅलेंट असणाऱ्या कलाकारांना संधी मिळणार आहे. त्यासाठी काही व्हिडीओ या वाहिनीला पाठवल्यास त्यातून या कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. तुमचं टॅलेंट जर मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असेल, तर 'झी युवा'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र म्हणेल, 'लाव रे तो व्हिडिओ'.
कॉमेडी, डान्स, मिमिक्री अशा अनेक टॅलेंटचा या कार्यक्रमात समावेश असेल. विशेष म्हणजे या आगामी कार्यक्रमाचा सुत्रसंचालक हे खास सरप्राईज असल्याचं वाहिनीच्या टीमचं म्हणणं आहे. तेव्हा या नव्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध टॅलेंट या निमित्ताने एकत्र येणार असल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळेल. सोशल डिस्टंसींगचे पालन करत महाराष्ट्राचं हटके मनोरंजन या कार्यक्रमातून होईल.