प्रविण तरडे लिखीत, दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमाच्या घोषणेनंतर हा सिनेमा कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. मराठीतील बरेच कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अभिनेता राकेश बापटही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
एकीकडे लॉकडाउनमध्ये ठप्प झालेलं मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू पूर्ववत होत आहे. याच पार्श्वभूमिवर 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाच्या डबिंगलाही सुरुवात झाली आहे. नुकतच अभिनेता राकेश बापटने त्याच्या डबिंगला सुरुवात केली आहे. डबिंग स्टुडिओमधील व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. राकेशची या सिनेमात काय भूमिका असेल हे अद्याप समोर आलेलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. आणि त्यांच्यावरच आधारित हा सिनेमा आहे. मराठीतील विविध कलाकार या सिनेमातील विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिका साकारणार आहेत. त्या भूमिका कोणत्या आणि ते कलाकार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच अभिनेत्री श्रुती मराठे या सिनेमात सोयराबाईंची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं होतं.
या सिनेमाचे काही फर्स्ट लुक पोस्टरही प्रदर्शित झाले असून. या सिनेमाविषयीच्या इतर घोषणेची वाट पाहायची आहे.