By  
on  

अभिनेत्री प्रिया मराठेने घरात बनवला हा पदार्थ, सासऱ्यांकडून मिळालं हे बक्षीस

लॉकडाउनमुळे परिवार मंडळी घरात एकत्र आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कामात व्यस्त असलेले आणि घराबाहेर असलेली मंडळीही या निमित्ताने त्यांच्या कुटुंबासोबत घरी आहेत. यातच महिला मंडळ स्वयंपाक घरात परिवारासाठी विविध पदार्थ बनवत आहेत. अभिनेत्री प्रिया मराठेही सध्या घरात विविध पदार्थ बनवत आहे. मात्र एक खास पदार्थ तिने नुकताच घरी स्वत: पहिल्यांदा बनवला आहे.

गणपतीत फक्त मोदक वळायला मदत करणाऱ्या प्रियाने नुकतेच स्वत: उकडीचे मोदक बनवले आहेत. हा आनंद तिच्यासाठी खास आहे. आणि म्हणूनच हा आनंद तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर केला आहे. तिने बनवलेले  हे मोदक तिने घरात सगळ्यांना खाऊ घातले  आहेत. तिने बनवलेले हे मोदक खाऊन प्रियाचे सासू-सासरे आणि पति शंतनूदेखील खूश झालाय. मात्र या बदल्यात प्रियाला खास बक्षीसही मिळालं आहे. हे बक्षीस तिला तिच्या सासऱ्यांनी दिलं  आहे. या पोस्टमध्ये ती याविषयी लिहीते की, "आत्ता पर्यंत मी फक्त गणपतीत घरी मोदक वळले होते.. कारण सारण आणि उकड माझ्या वाहिन्या, काकू करायच्या.. पण काल पहिल्यांदा मी सगळं स्वतः केलं.. सारण, उकड, मोदक वळून खण्यापर्यंत सगळं..सासू-सासरे, नवरा खुश..बक्षीस म्हणून केशराचे मळे मिळाले सासाऱ्यांकडून."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आत्ता पर्यंत मी फक्त गणपतीत घरी मोदक वळले होते.. कारण सारण आणि उकड माझ्या वाहिन्या, काकू करायच्या.. पण काल पहिल्यांदा मी सगळं स्वतः केलं.. सारण, उकड, मोदक वळून खण्यापर्यंत सगळं.. सासू-सासरे, नवरा खुश.. बक्षीस म्हणून केशराचे मळे मिळाले सासाऱ्यांकडून #lockdowncooking #homechef #punehome #cookingfrfamily

A post shared by Priya Marathe (@priyamarathe) on

 

प्रिया सध्या  घरात होम शेफ बनली आहे. आणि घरातल्यांचे खाण्याचे लाड पुरवत असल्याचं पाहायला मिळतय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive