मिथीला पालकरला फोनमध्ये सापडला हा जुना फोटो, बोलली या कोस्टार मित्राविषयी

By  
on  

मनोरंजन विश्वातील एखादा प्रोजेक्ट करताना सहकलाकारांसोबतचे कलाकारांचे नाते त्या प्रोजेक्टनंतर बहुदा बदलते. सहकलाकाराचे मैत्रीतही रुपांतर होते. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. अभिनेत्री मिथीला पालकरच्या बाबतीतही असच झालय. 'चॉपस्टीक्स' या नेटफ्लिक्स वेब फिल्ममध्ये मिथीला ही अभिनेता अभय देओलसोबत झळकली होती. मात्र सिनेमांतरही त्यांची मैत्री कायम राहिली आहे.

 

मिथीलाने नुकतीच एक सोशल मिडीया पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मिथीला तिच्या अभय देओल सोबतच्या मैत्रीविषयी सांगते. या सिनेमादरम्यान दोघांची झालेली मैत्री आणि त्यानंतरही कायम असलेल्या नात्याविषयी मिथीला या पोस्टमध्ये लिहीते. ती लिहीते की, ""फोनमधील फोटोंची गॅलेरी साफ करताना हा फोटो सापडला, आणि लक्षात आलं की मी याच्यासोबत सेटवर असणं किती मिस करतेय. एखादा प्रोजेक्ट संपल्यानंतर क्वचितच लोकं तुमच्यासोबत संपर्कात राहतात. मात्र अभय देओलने तर शपथच घेतली आहे की तो त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसोबत आयुष्यभर माझ्यासोबत असेल आणि त्याने ते केलंही. धन्यवाद माझा खूप चांगला मित्र बनण्यासाठी."या पोस्टमधून मिथीलाने अभयचे आभार मानले आहेत. 

सध्या थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड सोशल मिडीयावर सुरु आहे. यातच मिथीलानेही तिचा हा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. 

  

Recommended

Loading...
Share