By  
on  

सुशांत हा अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'आई' म्हणूनच हाक मारायचा

बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं.  मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहते आणि कलाविश्व आज शोकसागरात बुडालं. त्याचं जाणं चटका लावून तर गेलंच पण आत्महत्येचं गूढ अद्याप अस्पष्टच आहे. 

पवित्र रिश्ता या एकता कपूरच्या गाजलेल्या मालिकेतील मानवच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोहचला. या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेत मानव साकारणा-या  सुशांतच्या आईच्या भूमिकेत मराठीतील दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी होत्या. नुकत्याच एका वृत्तवाहिनीशी सुशांतच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना त्या गहिवरुन गेल्या.

मालिकेमुळे तीन ते साडे-तीन वर्ष त्या सुशांत सोबत होत्या. "खुप लाघवी मुलगा होता तो, मला सारखं आई आईच करायचा....सेटवर येताना माझ्या मागे नेहमी तगादा लावायाचा आई काहीतरी खायला बनवून आणा ना...आज या बातमीवर माझा विश्वासच बसत नाहीय....इतक्या लहान वयात त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय,,,", असं उषाताई हुंदके आवरत म्हणाल्या. 

छोटा पडदा गाजवणा-या  पवित्र रिश्ता या मालिकेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive