By  
on  

‘लकी’ सिनेमातील हे नवीन गाणं तुम्हाला ९०च्या दशकाची आठवण नक्कीच करून देईल

सध्या इंटरनेट सेंसेशन बनलेला ‘लकी’ सिनेमा पोस्टरवरुनच रसिकांची उत्सुकता वाढवत आहे. या उत्सुकतेला वाव देण्यासाठी निर्मात्यांनी या सिनेमातील पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे.

या गाण्यात अभय आणि दीप्ती एकदम रोमॅटिक मूडमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाण्याला ८०च्या दशकातील ‘हिम्मतवाला’ सिनेमामधील गाण्याची पार्श्वभूमी असल्याने गाणं अधिक उठावदार वाटतं. दिप्ती या गाण्यात खुपच खास दिसत आहे. हे गाणं सुप्रसिद्ध गायक बप्पी लहिरी आणि वैशाली सामंत यांनी गायलं. या गाण्याला अमितराज यांनी संगीतसाज चढ्वला आहे.

व्हिडियो पॅलेसने रसिकांना या धमाकेदार गाण्याची भेट दिली आहे. या गाण्याचे बोलही उत्तम असून नवीन जनरेशनच्या ओठावर हे गाणं सतत राहील यात शंका नाही.

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Nl5cxRgg2ys&feature=youtu.be

Recommended

PeepingMoon Exclusive