By  
on  

चिन्मय मांडलेकरने जागवली जुन्या दिवसांची आठवण, शेअर केला हा फोटो

अभिनेता चिन्मय मांडलेकर एक उत्तम अभिनेता आहेच पण याशिवाय चांगला लेखकही आहे. त्यामुळे चिन्मयचं फॅन फॉलोइंगही बरंच आहे. त्याने सोशल मिडियावरील फॅन्ससोबत एका आठवण शेअर केली आहे. त्याने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत संतोष जुवेकरही दिसत आहे.

चिन्मय आणि संतोष यांचा हा वर्कआउट सेशननंतरचा आहे. या दोघांचा ट्रेनर संजित चांदोरकर याने हा फोटो काढला आहे. या फोटोमधील संतोष आणि चिन्मय सहज ओळखू येतीलच असे नाही. पण हा दोघांमधील मैत्रीचा बंध मात्र जाणवतो. या दोघांनीही ‘झेंडा’ आणि ‘मोरया’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. आहे. या सिनेमांमुळे त्यांची मैत्री घट्ट होण्यास मदत झाल्याचं चिन्मय आवर्जून सांगतो.

https://www.instagram.com/p/Bpd4G_Ch0bY/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive