पहिला महिला डॉक्टर होण्याचा मान ज्यांनी मिळवला त्या आनंदीबाई गोपाळराव जोशींची गोष्ट रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा वसा झी स्टुडिओजने घेतला आहे.
झीच्या आगामी ‘आनंदी गोपाळ’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये अवघ्या दहाव्या वर्षी आंतरपाटासमोर उभ्या असलेल्या आनंदीबाईंची झलक अगदी काही क्षणापुरतीच या टीझरमध्ये दिसते.
या सिनेमात गोपाळराव जोशींची भूमिका ललित प्रभाकर साकारत आहे. कर्मठ समाजात राहून आधुनिक विचार जपणा-या गोपाळरावांच्या भूमिकेचं शिवधनुष्य ललितने सहज पेलल्याचं दिसून येत आहे. ललितने आपली रोमॅटिक हिरोची इमेज पुसून टाकण्याचा प्रयत्न पुरेपूर केल्याचं दिसून येत आहे.
गोपाळरावांच्या हठवादी स्वभावाचा प्रत्यय रसिकांना यावा म्हणून ललितनेही भरपूर मेहनत केल्याचं दिसून येत आहे. या टीझरमधील एका प्रसंगात आनंदी आणि गोपाळच्या विवाहाची बोलणी चालू असतान, वधूचं शिक्षण झालेलं असावं अशी अट गोपाळरावांनी व्याह्यांपुढे ठेवल्यानंतर झालेला संघर्ष त्याकाळच्या मानसिकतेचं चित्रण घडवतो. स्वातंत्र्यपूर्व काळ जसाच्या तसा उभा करण्यामध्ये आनंदी गोपाळच्या टीमला यश आल्याचं टीझरमध्ये दिसून येत आहे. या सिनेमातील आनंदीबाईंचं पात्र कोण साकारणार आहे याबाबतची उत्सुकता अजूनही कायम आहे. हा सिनेमा १५ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.
https://www.youtube.com/watch?time_continue=1&v=7QvPZ52sn3M