सध्या लॉकडाउनच्या काळात परिवार मंडळी एकत्र आली आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळं कुटुंब घरात असल्याने काही ठिकाणी आनंदी वातावरणही पाहायला मिळतय. प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा अभिनेता चिराग पाटील देखील त्याच्या परिवारासोबत वेळ घालवतोय.
चिराग आणि त्याचा परिवार सध्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहेत. चिरागने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत चिरागचे सासरे सलील अंकोला त्याची पाठ चेपून देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. फार्महाउसवर ही मंडळी एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. या व्हिडीओतून सासरे-जावई यांची मैत्री पाहायला मिळतेय.
सलील अंकोला हे देखील क्रिकेटपटू होते त्यानंतर ते अभिनेय क्षेत्रात आले. सलील यांची मुलगी सना अंकोला ही चिरागची पत्नि आहे.