कलाकारासाठी त्याचा प्रत्येक सिनेमा खास असतो. पण काही सिनेमे मनात खास आठवण सोडून जातात. अभिनेत्री मधुरा साटमसाठी एक सिनेमा असाच खास आहे. मधुराने तिच्या ‘हापुस’सिनेमाच्या आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. या सिनेमाला नुकतीच 10 वर्षं पुर्ण झाली आहेत. मधुराने या सिनेमातील एक गाणं पोस्ट करत ही बाब शेअर केली आहे.
या सिनेमात मधुराने डबल रोल केला होता. विशेष म्हणजे या सिनेमात ती सासरे शिवाजी साटम यांच्या लेकीच्या भूमिकेत दिसली होती. एक अवखळ आणि एक बिनधास्त अशा दोन्ही व्यक्तिरेखा मधुराने साकारल्या होत्या. तर अभिनेता सुबोध भावेने मधुराच्या भावाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे याबाबतही तिने नमूद केलं आहे.