आज इशा कायमची होणार विक्रांतची, शाही विवाहसोहळ्याचं आज प्रक्षेपण

By  
on  

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित इशा-विक्रांतच्या शाही विवाहसोहळ्याचा आनंद आज प्रेक्षकांना घेता येणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता विवाहसोहळ्याला सुरुवात होईल. प्रेमाच्या वेगळ्या वाटेवरून चालणारे इशा आणि विक्रांत आज सात जन्मांसाठी एकत्र येतील.

वय, समाज, आर्थिक परिस्थिती या सगळ्यांच्या पलीकडे समंजसपणाच्या पायावर विक्रांत आणि इशाचं प्रेम फुललं. या प्रेमाची वाट म्हणावी इतकी सोपीही नव्हती. पण अनेक अडचणींमधून मार्ग काढताना इशा आणि विक्रांतला प्रत्येक पावलावर प्रेमाची परीक्षा द्यावी लागली. कधी मायराच्या मत्सराला तोंड द्यावं लागलं. तर कधी झेंडेच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. सगळ्यात कठीण परिक्षा होती ती इशाच्या बाबांचा होकार मिळवण्याची. पण विक्रांतच्या समंजसपणामुळे इशाच्या बाबांनीही होकार दिला आणि इशा विक्रांतच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला.

https://twitter.com/zeemarathi/status/1084284398843891714

१३ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता इशा आणि विक्रांतचा विवाहसोहळा पार पडेल. यावेळी विक्रांतच्या नावाचं मंगळसुत्र इशा घालेल तर इशाचं नाव कोरलेलं ब्रेसलेट विक्रांत सदैव आपल्याजवळ बाळगेल. या विवाहसोहळ्याचा आनंद संध्याकाळी सात वाजल्यापासून घ्यायला विसरू नका.

 

Recommended

Loading...
Share