पुनश्च हरिओम म्हणत आता हळूहळू मालिका-सिनेमांच्या शूटींगचा श्रीगणेशा होतोय. योग्य ती खबरदारी घेत आणि सरकारी नियम व अटींचं काटेकोर पालन करत तुमच्या मनोरंजनासाठी लाडक्या मालिका सज्ज होत आहेत. त्यामुळे आता रिपीट्स बघून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
छोट्या पडद्यावरची कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी सर्वात लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले २ चं शूटींग लवकरच सुरु होत आहे. मालिकेत शेवंता साकारणारी प्रसिध्द अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेच याबाबत सोशल मिडीयाद्वारे माहिती दिलीय.
अपूर्वा म्हणते, माझे पायजमावाले दिवस संपले. आता वेळ आली आहे, कामावर परतण्याची...शेवंता तुला मी लवकरच भेटेन....असं म्हणत शेवंताने , तुम्ही उत्सुक आहात की नाही तिला भेटायला असा सवालही केला आहे.
अपूर्वा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते, तिेन दिलेल्या या बातमीनंतर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील अण्णा-शेवंताची केमिस्ट्री तुफान गाजतेय, त्यामुळे मालिकेचे लॉकडाऊननंतरचे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर झाले असणार.