अभिनेत्री मानसी नाईक ही उत्तम परफॉर्मर आहे आणि तिच्या डान्सचे आपण सर्वच दिवाने आहोत. मानसी आणि डान्स असं जणू समीकरणच बनलं आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानसीच्या डान्सने चॉर चॉंद लागतात. काही महिन्यांपूर्वीच मानसीने आपल्या नात्याची कबुली सोशल मिडीयावरुन दिली. मानसी ही मॉडेल प्रदीप खरेराला डेट करतेय. दोघंही मेड फॉर इच अदर असेच कपल आहेत.
क्वारंटाईनचा हा काळ मानसी आणि प्रदीप एकमेकांसोबतच क्वालिटी टाईम म्हणूनच घालवतायत.
सोशल मिडीयावर सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. टिक टॉक या ऐपवरही मानसीचे प्रचंड व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. शिवाय आता मानसी आणि प्रदीपचे एकत्र व्हिडीओही चर्चेत असता
चाहत्यांनासुध्दा मानसी-प्रदीप हे पॉवर कपल प्रचंड आवडतंय. तेसुध्दा लाईक्स फोटो , व्हिडीओंवर कॉमेंट्सचा व लाईक्सचा वर्षाव करतात. आता दोघं लग्न कधी करतायत याचे चाहत्यांना वेध लागले आहेत.