अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. सुशांतच्या निधनाने बॉलिवुडसह त्याचे चाहतेही हळहळले. सुशांतच्या जाण्याला आज दोन आठवडे झाले आहेत. पण त्याच्या आत्महत्येसंबंधी तपास अजूनही सुरुच आहे. या दरम्यान सुशांतच्या अनेक आठवणी सोशल मिडियावर शेअर केल्या जात आहे.
अभिनेता नाना पाटेकर यांनीही नुकतीच सुशांतच्या पटना येथील घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केलं. याशिवाय सुशांतच्या फोटोला हार घालून श्रद्धांजलीही वाहिली. सुशांतबाबत सांगताना ते म्हणतात, ‘मी त्याला एकदा भेटलो होतो. त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मी त्याचे तीन सिनेमे पाहिले होते. मी त्याच्या कामाशी प्रभावित होतो.’ सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पोलिस त्याच्या आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत.