अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. लॉकडाऊनपासून दुबईमध्ये असलेली सोनाली अनेकदा विविध गोष्टींमध्ये मन रमवत आहे. सोनाली कुलकर्णी या लॉकडाऊनमध्ये पुस्तक वाचणे, कुकिंग, एक्सरसाईज यामध्ये वेळ घालवते आहे.
आता मात्र तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर याने सोनालीचे हे फोटो काढले आहेत. सोनालीने यावेळी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅण्ट घातली आहे. या ब्लॅक व्हाईट फोटोंमध्ये सोनाली अधिकच एलिगंट दिसत आहे यात शंका नाही.