सध्या लॉकडाऊनच्या काळात सामान्यांसारखेच सेलिब्रिटीसुध्दा आपल्या कुटुंबांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत.रोज शूटींगच्या धावपळीमुळे आमि बिझी शेड्यूलमध्ये असा निवांत वेळ कधीच मिळाला नव्हता. त्यात मुलांसोबत तर फारच कमी वेळ प्रत्येकाला मिळतो. कारण आपल्या कामाचा व्याप आणि त्यात मुलांच्या शाळा-क्लासेसचे वेळापत्रक असं गणित जुळवून वेळ काढणं म्हणजे तारेवरची कसरत. पण लॉकडाऊनच्या दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत मात्र मुलं आणि मोठे सर्वच घरी आहेत व सर्वांनी एकत्र मिळून दंगा घातला आहे.
आता हेच बघा ना...सिनेविश्वातला लाडका अभिनेता सुबोध भावेचासुध्दा त्याच्या मुलांसोबत घरी यथेच्छ धुडगूस सुरु असतो, हे वेळोवेळी पोस्ट करत असलेल्या फोटौ आणि व्हिडीओमधून पाहायला मिळतं. त्यात आता तर काय म्हणे....सुबोधच्या घरी एका घरगुती स्पायडरमॅनने शिरकाव केला आहे व तो त्याच्या घरात मुक्त संचार करतोय. खरं वाटत नसेल तर हा व्हिडीओ पाहा
सुबोधच्या ह्या व्हिडीओतला घरगुती स्पायडरमॅन म्हणजे त्याचा लाडका लेक कान्हा आहे. स्पायडरमॅनच्या वेशात आणि त्याच्या भाषेत तो मस्त घरभर वावरतोय. लहानांना या सुपरमॅन, स्पायडरमॅनचं भारी आकर्षण असतं हेच सुबोधच्या चिमुकल्याच्या व्हिडीओवरुन पाहायला मिळालं. फिल्मी भावे असा हॅशटॅग देऊन सुबोधने हा धम्माल व्हिडीओ पोस्ट केलाय.
या व्हिडीओवर चाहत्यांनी कॉमेंटस् आणि वर्षाव करत पसंतीची पावती दिली आहे. तर सेलिब्रिटींनाही हा व्हिडीओ खुप पसंत पडल्याचं कॉमेंट्समध्ये पाहायला मिळतंय.