रसिकांच्या मनात अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण करणारी मालिका म्हणजे माझ्या नव-याची बायको. ही मालिका केवळ झी वाहिनीचाच नव्हे तर रसिकांच्या मनाचाही भाग बनली आहे. नव-याच्या बाहेख्याली पणावर रडत न बसता परिस्थितीला कणखरपणाने तोंड देणारी राधिका आज महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा भाग बनली आहे.
ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये कित्येक आठवड्यापासून अव्वल आहे. या मालिकेतील खलनायिका शनाया बदलल्यानंतरही या मालिकेच्या लोकप्रियेत जराही बदल झालेला नाही. आता या मालिकेने काहीसं निर्णायक वळण घेतलेलं आहे. राधिका आणि घरच्यांच्या दबावाला झुगारुन गुरुनाथ आणि शनायाने लग्न केलं आहे. पण शनायाच्या आईच्या हावरेपणामुळे शनाया आईजवळच रहात असते.
आता पुढील काही भागांमध्ये राधिका ‘नव-याच्या बायकोला’ म्हणजेच शनायाला घरी आणायचं ठरवते. आता राधिका ही खेळी खेळून गुरुनाथला धडा शिकवू शकेल कि यातून काही वेगळी समस्या उदभवेल हे समजायला मालिका पाहायला हवी.
https://www.instagram.com/p/BscP8lBAJlv/?utm_source=ig_web_copy_link