सध्या लॉकडाऊनमध्ये आपले लाडके सेलिब्रिटी काय करतील याचा काही नेम नाही...चाहत्यांच्या मनोरंजनासाठी ते सतत सक्रीय असतात. असाच एक उत्स्फूर्त प्रयत्न नुकताच अप्सरेने केला आहे. म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे विविध मूडसचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत आणि त्याला भन्नाट कॅप्शनही दिले आहेत. ते पाहून तुमचीसुध्दा हसून पुरेवाट लागेल. चला तर पाहूयात हे खास फोटो.
भांडी घासून झाल्यावर कंबरडं मोडलेली सोनाली अशी दिसतेय. लॉकडाऊनमध्ये सोनालीला #घरकामाचाकंटाळाआलाय आहे, म्हणून तिला हे सुचलेलं दिसतंय
.
भांड्यांनंतर कपडे धुवून झाल्यावर कंबरडं मोडलेली सोनाली अशी दिसते.
तर आता घरातली कुठली कामं उरली आहेत, या विचारानेच बिच्चा-या सोनालीचं कंबरडं मोडलं आहे. सोनाली आमि तिचा भावी पती कुणाल बेनोडेकर हे दोघंही सध्या दुबईत आपल्या लॉकडाऊन काळ व्यतीत करतायत. तिथूनसुध्दा सोनाली सतत सोशल मिडीयावर सक्रीय असते.
सोनालीच हे फेसटाईम फोटोशूट सेलिब्रिटी फोटोग्राफ तेजस नेरुरकरने केलं आहे. कालच तिने तिचं ब्लॅक आणि व्हाईट फोटोशूट शेअर केलं होतं, त्यालासुध्दा याप्रमाणेच चाहत्यांनी पसंतीची पावती दिली.