अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असतो. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतो. आताही त्याने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोची खासियत म्हणजे हा फोटो सिद्धार्थने सुपरहिरोंसोबत काढला आहे. हे सुपरहिरो सिनेमातील नाहीत तर ख-या खु-या आयुष्यातील आहेत.
या पोस्टला कॅप्शन देताना सिद्धार्थ म्हणतो, ‘सध्या lockdown सुरू असल्यामुळे workout सुरू आहे .. walk ही सुरू आहे .आज खऱ्या हिरोंबरोबर सेल्फी काढायला मिळालं ... दादरमध्ये शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातील हे आपले पोलिस बांधव आपलं कर्तव्य बजावतात.....या सेल्फीच्या निमित्ताने तमाम मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना मानाचा सलाम’. खरं तर या कठीण काळात संकटाला धैर्याने सामोरं जात खंबीरपणे उभे आहेत ते पोलिस. त्यामुळे सिद्धार्थने त्यांना सुपरहिरो हा वापरलेला शब्द अगदी समर्पक आहे