नेहमीच आपल्या कल्पक विनोदबुध्दीने रसिकांची मनं जिंकणारा लाडका अभिनेता सुव्रत जोशीने त्याच्या लेटेस्ट पोस्टमधून एक जबरदस्त आयडिया सांगितलीय. तिसुध्दा रेकॉर्डिंगची, पण त्यासाठी त्याला प्रचंड घाम गाळावा लागला आहे. तुम्हाला वाटेल म्हणजे, नेमकं काय करावं लागतं....व्यायाम वगैराचे कठीण प्रकार असं काही आहे का...तर अजिबातच नाही. चक्क जाड रजई अंगावर पांघरुन त्याच्या आत रेकॉर्डिंग करा असं सुव्रत सांगतोय....नुसता सांगतच नाही तर त्याने तो प्रयोग यशस्वीसुध्दा केला आहे.
अनेकांना गाणी, कथा रेकॉर्ड करायच्या असतात. लॉकडाऊनमध्ये घरातील गडबड गोंधळाच्या वातावरणात ते अशक्य वाटतं. म्हणूनच सुव्रतची ही नामी शक्कल तुम्हालाही उपयोगी पडेल.