By  
on  

वाढलेल्या ‘केसेस’ सुबोध भावेने कमी केल्या, कशा? पाहा तुम्हीच

अभिनेता सुबोध भावे या लॉकडाऊनमध्ये अनेक भन्नाट पोस्टमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनमध्ये सुबोधकडे बराच वेळ शिल्लक आहे. हा वेळ तो घरच्यांना देतो आहेच. पण सोशल मिडियावर चाहत्यांशीही संपर्कात आहे. तो सोशल मिडियावर अनेकदा धमाल पोस्ट शेअर करत असतो. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सर्व केसेस कमी केल्या.

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

   
आताच्या पोस्टमधून त्याने त्याचा नवीन लूक शेअर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये सलून बंद असल्याने सुबोधचे दाढी आणि केस बरेच वाढले होते. पण आता त्याने हेअर कट आणि क्लीनशेव सहित फोटो शेअर केला आहे. या फोटोला मजेदार कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘सर्व केसेस कमी केल्या’ . अर्थात त्याच्या  भन्नाट कॅप्शनला चाहत्यांनी रिप्लायही भन्नाट दिलं आहेच. याशिवाय त्याच्या नवीन लूकचं कौतुकही केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive