दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारक-यांचा लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळतो. लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..नामाचा अखंड गजर करत या वारक-यांमुळे संपूर्ण पंढरपूर दुमदूमून निघते. पण यंदा करोना संकटामुळे या उत्साहावर विरजण पडलं. तरी साधेपणाने विठूमाऊलीचा एकादशी सोहळा आज पंडरपूात पार पडला. आपल्या प्रत्येकाच्या मनामनांत विठ्ठल आहे. तेव्हा विठू माऊलीचा जप करत आपण घरुनच विठूरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशी साजरी करु.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणा दा यांचा लाडका लाडूसुध्दा आषाढी एकादशी यंदा घरुनच उत्साहात साजरी करतोय. त्याचप्रमाणे त्याने वारकरी बंधूंच्या वेषात टाळ मृदुंगाच्या साथीने विठ्ठलाच्या जयघोषातील एक व्हिडीओसुध्दा शेअर केला आहे आणि चाहते लाडूफेम बालकलाकार राजवीरचं हे वारकरी रुप पाहून खुप खुश झाले आहेत.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजवीरच्या या व्हिडीओ व फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुुरु केला आहे.