आषाढी एकादशीनिमित्त आज सगळीकडे भक्तीमय माहोल आहे. जरी याची देही याची डोळा...श्रीहरी विठ्ठलाचं रुप न्याहळता येत नसलं तरी प्रत्येकाच्या मनामनांत विठ्ठल वसला आहे. विठूरायाचा जप करत सर्वचजण घरातूनच या करोना संकटामुळे आषाढी एकादशी साजरी करतायत. तसंच या विषाणूच्या संकटातून महाराष्ट्राला आणि देशाचं रक्षण कर असं साकडं विठ्ठलाला घालतायत.
सोशल मिडियावर देखील एकादशीनिमित्त उत्साह पाहायला मिळतोय. अनेक कलाकार आषाढीनिमित्त शुभेच्छा देत आहेत. पण अभिनेता गश्मिर महाजनीने आशाढीनिमित्त एक खास फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
विठु माऊलींच्या वारीत सहभागी झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा फोटो आजच्या शुभ दिनी, प्रथमच तुमच्या सोबत शेअर करत आहे. जय जय राम कृष्ण हरी..,असं म्हणत तमाम वारकरी बंधूंना, विठ्ठल भक्तांना गश्मिरने आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पण हा फोटो शेअर करताना तो कुठल्या आगामी सिनेमा, नाटक किंवा वेबसिरीजचा आहे हे अद्याप उलगडलेलं नाही. चाहत्यांनी मात्र या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.