रात्रीस खेळ चाले -भाग २ या मालिकेतील शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर महाराष्ट्रातील कानाकोप-यातील प्रेक्षकांच्या मनावर अधिाज्य गाजवतेय.करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे जवळपास तीन महिने मालिका-सिनेमाचं शूटींग ठप्प होतं . त्यामुळे शेवंता आणि प्रेक्षकांची भेट होऊ शकली नाही. पण आता सरकारने नियम व अटी पाळण्याचे आदेश देत शूटींगला सुरुवात करण्यास परवानगी दिली.
रात्रीस खेळ चाले -२ चं शूटींग लवकरच सुरु होत असल्याचं अपूर्वानेच तिच्या सोसल मिडीया अकाऊंटवरुन सांगितलंय. आता असाच गुगुलचा एक मीमव्हिडीओ शेअर करत चाहत्यांमध्ये शेवंताची उत्सुकता अपूर्वाने निर्माण केली आहे.