आज एक जुलै. आजचा दिवस Doctor’s Day म्हणूनही साजरा केला जातो. सध्याच्या करोनाच्या काळात सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी कोण पार पाडत असेल तर डॉक्टर्स. तासंतास रुग्णाच्या सेवेत राहून त्याच्या आरोग्याचं रक्षण करत असलेल्या डॉक्टरांच्या प्रती आज अनेकजण कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
अभिनेता सिद्धार्थ जाधवही याला अपवाद नाही. सिद्धार्थने डॉक्टरांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आभार मानले आहेत. सिद्धार्थ म्हणतो, ‘एक सलाम सैनिकांना !! एक कोरोना वॉरिअर्सना !! १ जुलै.... डॉक्टर्स डे....आज तुमचा दिवस..खुप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत.... कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्सनी जे कर्तव्य बजावलय ते अतुलनीय आहे.त्याचबरोबर नर्स, सफाईकर्मचारी,पोलीस, मिडीयाप्रतिनिधी सर्व कोरोना वॉरिअर्स यांनी धाडसी काम केलय...’ सिद्धार्थने अलीकडेच पोलिसांसोबतचा सेल्फी पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहे.