या करोनाने प्रभावित झाला नसेल अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. करोनाने प्रत्येकाच्याच आर्थिक, सामाजिक वैयक्तिक आरोग्यावर परिणाम केला आहे. करोनाने अनेकांच्या हातातील कामही थंड पडलं आहे. मनोरंजन क्षेत्राशी अवस्था याहून वेगळी नाही. लॉकडाऊनमुळे अनेक बॅकस्टेज कामागारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आता हळू हळू मालिकांच्या शुटिंगला सुरुवात होताना दिसत आहे.
पण रंगभूमीचा पडदा उलगडायला मात्र बराच वेळ आहे असं दिसत आहे. अभिनेता कुशल बद्रिकेला ही हीच चिंता सतावते आहे. कुशलने एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो स्टेजवर आहे. पण त्याच्यासमोरचं थिएटर मात्र पुर्ण मोकळं आहे. या पोस्टला कॅप्शन देताना कुशल म्हणतो,
‘आयुष्याला आलेलं हे रिकामेपण, अख्ख आयुष्यतर व्यापून टाकणार नाही ना ?’ सध्या कुशलला सतावत असलेला प्रश्ना प्रत्येक कलाकाराला सतावत असेल यात शंका नाही.