अभिनेत्री स्पृहा जोशी या लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली. कृतज्ञता डायरी मग खजिना सिरीज आणि आता DIY Hacks and Crafts series मधून ती चाहत्यांशी धमाल गप्पा मारताना दिसते. तिच्या या नव्या सिरीजचा पहिला एपिसोडसुद्धा रिलीज झाला आहे.
आता या सिरीजच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर स्पृहाने दुसरा भागही आणला आहे. यामध्ये स्पृहा तिची मैत्रिण पुर्वा पंडितसोबत वेगवेगळे DIY (Do it yours) व्हिडियोज बनवताना दिसते आहे. यासोबतच या व्हिडियोमध्ये ती व्हॅन गॉग या जगप्रसिद्ध चित्रकाराची माहिती ही देत आहे. आजच्या एपिसोडमध्ये तिने आणि पुर्वाने डेनिम पेंटिंगची कलाकुसर केली आहे. स्पृहाचे हे व्हिडियोज चाहत्यांना आवडतील यात शंका नाही.