लॉकडाऊनचा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावायचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. कुणी छंदांना वेळ देताना दिसत आहे तर कुणी नवीन प्रयोग करून पाहात आहे. अभिनेता स्वप्नील जोशी पिल्लू टिव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आताही त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यात आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत त्याने एका खास पोस्ट शेअर केली आहे.
जय हरी विठ्ठल..!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!https://t.co/wbOSIsnCvm pic.twitter.com/lmczY9dCtf— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) July 1, 2020
आषाढी एकादशीची महती, वारीचा उद्देश हे त्याच्या अमराठी प्रेक्षकांना माहिती व्हावं यासाठी पिल्लू टिव्हीवर तो याबाबतची माहिती शेअर करणार आहे. स्वप्नील या व्हिडियो शेअर करत ही माहिती दिली आहे. स्वप्नीलच्या या माहितीचं त्याचे फॅन्स नक्कीच कौतुक करतील यात शंका नाही.