अपूर्वा नेमळेकरच्या घरी आलीय ही 'Cool लक्ष्मी', पाहा हा धम्माल व्हिडीओ

By  
on  

लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी ट्रीट देण्याचा प्रयत्न आज कलाकार मंडळी करतायत. अनेकांनी त्यांसाठी सोशल मिडीया अकाऊंटचा आधार घेतलाय. तर काहींनी यासाठी आपले यूट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. शेवंताचंही तसंच. अहो, म्हणजे शेवंता म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर .अपूर्वा  नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी संपर्क साधते. आता अपूर्वानेही तिचं युट्यूब चॅनेल सुरु केलंय . या माध्यमातून ती धम्माल व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येते. 

खवचट जयश्री काकू म्हणून धम्माल उडवल्यालंतर आता अपूर्वाकडे आलीय   Cool लक्ष्मी. यात एका म्हाता-या पण कूल स्वभावाच्या या भन्नाट आज्जीला पाहून तुम्हीही खळखळून हसणार यात शंका नाही. 

 

अपूर्वाचा हा coolलक्ष्मी स्टाईल स्पेशल व्हिडीओ पाहून तुमचीही हसून हसून पुरेवाट लागेल याची खात्री आहे. चाहत्यांनीसुध्दा अपूर्वाच्या या नव्या एपिसोडवर लाईक्स , कॉमेंट्सचा वर्षाव करत पसंतीची पावती दिली आहे.

 

पाहा व्हिडीओ

 

Recommended

Loading...
Share