गोड आणि लोभस चेह-याची वैदेही परशुरामी ही सौंदर्यात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील कांचन घाणेकर या भूमिकेमुळे ती चर्चेत आली. त्यातील तिच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांची वाहवा देखील तिने मिळवली. तर त्यानंतर लगेचच वैदही 'सिंबा' ह्या रोहीत शेट्टीच्या बॉलिवूड सिनेमात झळकली.
तिची भूमिका एक शिक्षकेची असल्याचं ट्रेलरमध्ये दिसून आलं. यात तिचा लुक साधा असला तरी छोटी परंतु लक्षवेधी भूमिका तिच्या वाट्याला आली आणि तिने सर्वांची मनं जिंकली.
नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असणारी वैदही आपले मनमोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.