आक्कासाहेब म्हणून छोट्या पडद्यावर अक्कासाहेब म्हणून दरारा निर्माण करणा-या प्रसिध्द अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस.सध्या रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या आईच्या भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सिनेसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अभिनेत्री सोनाली खरेने हिने मात्र एक खास पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाली म्हणते, देवाने मला दोन आई दिल्या आहेत. एक जन्मदाती आणि दुसरी माझ्या खुप प्रेम करणारी आणि नेहमी माझ्या पाढीशी असणारी हर्षदाताई माझी आईच आहे.