By  
on  

रंगील्या लकीचा अनोखा अंदाज , पाहा संजय जाधव यांच्या लकी सिनेमाचा ट्रेलर

कॉलेजमध्ये जाणा-या प्रत्येक मुलाला वाटत असतं की आपल्याला गर्लफ्रेंड असावी. लकीच्या आयुष्यातही ‘जिया’च्या रुपाने हॉट गर्लफ्रेंड येते आणि मग सुरु होते खरी धमाल. संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. संजय जाधव पुन्हा एकदा हॉट आणि फ्रेश स्टोरी घेऊन प्रेक्षकांसमोर आले आहेत.

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

 

एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग 'लकी' सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. ह्या पोस्टरबद्दल बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, “मराठी तरूण आणि मराठी सिनेमा कात टाकतोय. आजच्या तरूणांवरचा सिनेमा असल्याने तुम्हांला असे अनेक सुखद आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. संजयदादा निखळ मनोरंजनासाठी लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या धाटणीची मनोरंजक फिल्म आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय.”

फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “लकी ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंद आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हांला अशी अपारंपारिक सरप्राइजेस मिळतील.”

या सिनेमात दिप्ती सती आणि अभय महाजन यांनी धमाल उडवून दिली आहे. दिप्तीचा बिकीनीमधला लूक रसिकांना मोहात पाडेल आणि अभयचं कॉमिक टाईमिंग प्रेक्षकांना खळखळून हसवेल. हा सिनेमा ७ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=0jiQjIH1jbo

 

Recommended

PeepingMoon Exclusive