आयुष्याचं प्रयोजन सांगणा-या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण आज लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या गुरुला व्हर्च्युअलीच वंदन केलं. दिग्दर्शक, गायक सलील कुलकर्णी यांना मात्र आजच्या दिवशी शिष्यांकडून खास मानवंदना मिळणार आहे. सलील यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणतात,
मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवेदूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हांसवें ... !! बोरकरांच्या ह्या ओळी जेवढ्या मुलांसाठी , नातवंडांसाठी तेवढ्याच शिष्यांसाठी सुद्धा वाटतात मला .. कोणताही शिष्य मनापासून गाताना दिसला की वाटतं...आपण गातोय....!! गेल्या एकवीस वर्षात अडीचशे -तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी -विद्यार्थिनी शिकले , आजही शिकतायत ..काही नामवंत गायक झाले आणि संगीतकार होऊ पाहतायत .. एक नक्की कि सगळे उत्तम गाणं ऐकणारे झाले .. अनुभवणारे झाले .. रसास्वाद घेणारे झाले आणि होतायत .
एरवी, माझ्या शिष्यांनी घरी येऊन गुरुपूजन वगैरे करावं ह्यात मला फार रस नसतो .. एकदा गाणं शिकवून झालं कि तुम्ही माझे मित्र..मी ह्या मताचा आहे . पण lockdown च्या काळात .. उद्या गुरुपौर्णिमेला .. इंस्टाग्राम वर विविध देशातल्या माझ्या शिष्यांनी एक एक रचना, किमान त्याची झलक सादर करावी अशी कल्पना काही शिष्यांनी काढली आणि मला आवडली .
.. उद्या भारत , अमेरिका आणि इतरही अनेक देशातले अनेक विद्यार्थी रचना सादर करणार आहेत .. माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वर .. !! आणि मला आनंद घ्यायला आवडेल .. अगदी वाटलंच तर आठवण सांगायला आवडेल गाण्याची , कवितेची भेटूया .. ‘ एकंदरीत ही गुरुपौर्णिमा सलील यांच्यासाठी खास असेल यात शंका नाही.