By  
on  

पाहा सुजय डहाकेच्या ‘सेक्स, ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’चं फर्स्ट लूक पोस्टर

सध्या वेबसिरीजचा जमाना आहे असं म्हणायला हवं. कारण अनेक वेबसिरीजनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. मराठी सिनेसृष्टीतही वेबसिरीजचा बोलबाला आहे. आता दिग्दर्शक सुजय डहाकेही वेबसिरीजच्या क्षेत्रात उतरला आहे.
सुजयची ‘सेक्स, ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’ ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. Zee5 वर ही सिरीज प्रसारित होणार आहे. सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडी, एकांकिका, नाटकं यामध्ये त्यांच्या आयुष्यात होणारे बदल हे सर्व या वेबसिरीजमध्ये पहायला मिळेल. ही वेबसिरीज साधारण १० भागांची असेल.
सुजय त्याच्या दिग्दर्शन कौशल्यासाठी नावाजला जातो. शाळा, आजोब, फुंतरू यासारखे वैशिष्ट्यपूर्ण सिनेमे सुजयने दिग्दर्शित केले आहेत. या वेबसिरीजचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती सबकुछ सुजयमय आहे. त्यामुळे या वेबसिरीजला त्याचा खास टच लाभला असेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive